antarwali sarati manoj jarange patil strike maratha reservation deny to medical care politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही'', जरांगे थेट बोलले

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केलीत. दोन दिवस मी बोलू शकतो त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचं ते बोला, असं जरांगे म्हणाले.

रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल.

एकप्रकारे सरकारला चर्चेसाठी आंतरवाली सराटीची दारं खुली झाली आहेत. त्यामुळे आज आणि उद्या (सोमवारी) मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार कुणाला पाठवतं? हे बघणं महत्त्वाचं आहे. राज्यातील हजारो गावांमध्ये साखळी उपोषणं सुरु आहेत. शिवाय पुढाऱ्यांना गावबंदीदेखील केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

NCERT New History Book: बाबर क्रूर विजेता तर औरंगजेब हा मंदिरे तोडणारा; ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या नव्या पुस्तकातील माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा खमंग 'गोड ढोकळा', सोपी आहे रेसिपी

Satara News:'महाबळेश्वरात अतिक्रमण हटविताना गोंधळ'; शासकीय कामात अडथळा, आठ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT