Manoj Jarange  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : मुख्यमंत्री खोटं बोलणार नाहीत, फडणवीसांनीही खोटं बोलू नये; जरांगेंचं आवाहन

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजी नगर येथे उपचार घेत आहेत.

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजी नगर येथे उपचार घेत आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथील सभेत अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना अगोदर अंबाजोगाई येथेच दाखल करण्यात आलेलं होतं. आता ते छत्रपती संभाजी नगर येथे उपचार घेत आहेत. बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रुग्णालयातून माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते आणि गुन्ह्यांसंदर्भात आश्वासन दिलं होतं. त्यामुळे दिलेल्या शब्दाला जागून आंतरवाली सराटी आणि राज्यातील इतर भागातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांना पहिल्यापासून जातीय तेढ निर्माण करण्याची सवय आहे. आम्ही सरकारच्या शब्दाचा सन्मान केला आहे. पण सरकार जर भुजबळांचं ऐकून आमच्यावर अन्याय करणार असेल तर आम्ही सहन करणार नाही.

''एकनाथ शिंदे खोटं बोलणार नाहीत आणि देवेंद्र फडणवीसांनीही खोटं बोलू नये. त्यांचे प्रतिनिधी उपोषण सोडण्यासाठी आले होते. आमचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. फडणवीसांनी खरं बोलावं आणि गुन्हे मागे घ्यावेत. नाहीतर मराठ्यांना नाईलाजाने आंदोलन करावं लागेल.'' असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

नितेश राणेंना आवाहन

जातीपेक्षा नेते मोठे नाहीत. नितेश राणे म्हणतात, काहींना गावबंदी तर काहींना मुभा.. असं नाहीये. आमचं जेव्हा उपोषण सुटलं तेव्हा आम्ही गावबंदी उठवलेली आहे. राणेंवर दबाव असेल त्यामुळे ते आमच्याविरोधात बोलत असतील. परंतु त्यांनी मराठा समाजाची बाजू घ्यावी. कारण समाजापेक्षा पक्ष मोठा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : पाचोऱ्यात अवैधरित्या गॅस भरणाऱ्यावर पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची कारवाई

Narendra Modi: मोदींच्या सभेत महिलांचं 'खुर्ची युद्ध'! एकमेकींच्या डोक्यात घातल्या चेअर, Video Viral

SCROLL FOR NEXT