महाराष्ट्र बातम्या

Manora Aamdar Niwas: राज्यातील लोकप्रतिनिधींना मिळणार 40 मजली आमदार निवास; सुविधा पाहून व्हालं आवाक्

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या आमदार निवासाचं उद्घाटन करण्यात आलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींना आता ४० मजली आमदार निवास मिळणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. यावेळी नार्वेकरांनी या आमदार निवासाची वैशिष्ट्ये सांगितली. (Manora Aamdar Niwas construction started amazing facilities will be there need to know everything)

नार्वेकर म्हणाले, राज्यात आमदारांच्या राहण्याची व्यवस्थित व्यवस्था नव्हती त्यामुळं नवं 'मनोरा' आमदार निवास बनवण्यात येणार आहे. यासाठी ४० आणि २८ अशा दोन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३६८ निवासी अपार्टमेंट असणार आहेत. तसेच प्रत्येत अपार्टमेंट हे १ हजार स्केअर फुटांचं असेल.

अशा असतील अमेनेटिज?

हे आमदार निवास विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे. यामध्ये ८५० गाड्यांसाठी पार्किंग, कल्ब हाऊस, जिम्नॅशिअम, कॉन्फरन्स हॉल, रेस्तराँ अशा अनेक अत्याधुनिक सुविधा या आमदार निवासामध्ये असणार आहे. यामुळं सर्व आमदारांना एकाच ठिकाणी राहता येणं शक्य होणार आहे.

सीफेस आमदार निवासाला झाला विलंब

समुद्राला लागून असलेल्या या नव्या आमदार निवासाच्या कामासाठी सुमारे पाच वर्षांचा विलंब झाला आहे. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. या अडचणींमध्ये सीआरझेडचे कायदे, अधिकचा एफएसआयमुळं प्लॅनमध्ये बदल झाला होता. यामध्ये खर्चातही वाढ झाली आहे. पुढील अडीच वर्षात याचं कामकाज पूर्ण होईल, अशी माहितीही नार्वेकर यांनी दिली आहे.

सध्या आमदार निवासाची स्थिती काय?

आजपर्यंत विविध पाच ठिकाणी आमदारांना ठेवण्याची सोय केली जात आहे. यामध्ये मॅजेस्टिक आमदार निवास, विस्तारीत आमदार निवास, आकाशवाणी निवास, मनोरा आमदार निवास यांचा समावेश होता. जागा अपुरी पडत असल्यानं नव्या आमदार निवासाची निकड भास होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT