Maratha Reservation Ramdas Kadam esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : नारायण राणेंच्या मताशी मी सहमत, मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही - रामदास कदम

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास चांगला आहे; पण थोडा कच्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोकणातील मराठे असे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काही दिवसांपूर्वी कोकणातील मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही, असे म्हटले होते. यावर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही आपली तीच भूमिका असल्याचे सांगितले. त्यामुळे कुणबी जातीचे दाखले घेण्यावरून कदम आणि नारायण राणेंचे एकमत झाले आहे.

कदम म्हणाले, आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास चांगला आहे; पण थोडा कच्चा आहे. विदर्भ, मराठवाडा येथील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेतील; पण कोकणात कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. जरांगे यांना हे माहिती नाही. त्यामुळे कोकणातील मराठे असे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. जरांगे यांच्या उपोषणामागे काही राजकीय शक्तींचा हात आहे, असा आरोपही कदम यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली. मराठा समाजाला न्याय मिळावा याबाबत दुमत नाही. मराठा समाज किती मागासलेला आहे हे दाखवून द्या, असे न्यायालयाने म्हटले आहे. मराठवाड्यात किती मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी जीवन संपवले त्याची माहिती दिली तरी आरक्षण मिळेल, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाणपुलाचे काम करणारे कामगार घाबरले

चिपळूणमधील पूल दुर्घटनास्थळी राजकीय पक्षांचे नेते भेट देत आहेत; पण यामुळे भीतीने कर्मचारी बिथरले आहेत. त्यांनी येथून पलायन केले आहे. चिपळूण उड्डाणपूल कोसळल्यानंतर सेफ्टी इंजिनिअरला झालेल्या मारहाणीचा कामगारांनी धसका घेतला आहे. कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मोठे आव्हान आहे. उर्वरित गर्डर खाली उतरण्याचे काम बाकी आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या आंदोलनांना घाबरून कर्मचारीच गायब झाल्याने प्रशासन हैराण झाल्याचे कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT