ashok chavhan esakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 10 लाखांची मदत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत ज्या मराठा बांधवांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची घोषणा (Helped Annouced) ठाकरे सरकारनं (Thackeray Government) केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी मराठा आंदोलनात (maratha agitation) मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत जाहीर करण्याची घोषणा केलीय.

10 लाख रूपयांची मदत जाहीर

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. सदर कुटुंबाना 10 लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा समन्वयकांना दिला होता..

शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार हा निधी निर्गमित केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT