Maratha Community Reservation Eknath Shinde
Maratha Community Reservation Eknath Shinde esakal
महाराष्ट्र

Maratha Reservation: उपसमितीची बैठक संपली! 11,530 कुणबी नोंदी सापडल्या, उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

Maratha Community Reservation Eknath Shinde : मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज सकाळी सुरु झालेली बैठक संपली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली.

यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या तपासणीत ११,५३० जुन्या कुणबी असलेल्या नोंदी सापडल्या असून त्यावर उद्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Maratha Reservation CM Eknath Shinde Cabinet meeting sub committee Kunbi certificates)

11,530 कुणबी नोंदी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत अत्यंत तपशीलवार चर्चा झाली. यामध्ये न्या. शिंदेंची जी समिती आपण नेमली होती त्या समितीनं प्रथम अहवाल सादर केला आहे. (Latest Marathi News)

तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्विकारु तसेच त्याची पुढील प्रक्रिया आम्ही करणार आहोत. न्या. शिंदे कमिटीत १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ११,५३० जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

दोन महिन्यांची मुदतवाढ

तसेच या समितीनं सविस्तर अहवाल देखील सादर केला आणि फार जुने रेकॉर्ड तपासले यातील काही रेकॉर्ड्स हे उर्दू आणि मोडीत सापडले. पुढे त्यांनी हैदराबादमध्ये जुन्या नोंदींसाठी विनंती केली आहे. (Marathi Tajya Batmya)

यात आणखी काही नोंदी सापडतील त्यासाठी त्यांनी दोन महिन्यांची मुदत मागितली. समितीनं खूपच चांगलचं काम केलेलं आहे. डिटेलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सरकारनं त्यांना दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे.

या कामाचं आऊटपुट मोठं आहे. तरीही लवकरात लवकर आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांना दिलेत. म्हणून त्यांना कुणबी नोंदींच्या तपासणी करुन पुढील कार्यवाही सुरु होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

क्युरेटिव्ह पेटिशनवर काम सुरु

यानंतर दुसरा भाग म्हणून मूळ मराठा आरक्षण आहे जे सुप्रीम कोर्टात रद्द झालं त्यावरही सरकार काम करत आहे. तसेच क्युरेटिव्ह पेटिशनमध्ये सुप्रीम कोर्टानं ऐकण्याचं मान्य केलं आहे. त्यावरही सरकारचं युद्धपातळीवर काम सुरु आहे.

मागासवर्ग आयोगाचे निरगुडे यांची कमिटी यासाठी काम करत आहे. तज्ज्ञ संस्था सरकार त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, अशी माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुलाबाळांचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका

माझी विनंती आहे की गेल्यावेळी मराठा आरक्षणासाठी ५८ शिस्तबद्ध मोर्चे निघाले, त्याला गालबोट लागलं नाही. परंतू आज दुर्दैवानं काही लोकं कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत जाळपोळ सुरू आहे. मराठा समाजाने सजग होऊन याकडं पाहिलं पाहिजे. माझी विनंती आहे की नागरिकांनी टोकाचं पाऊल उचलू नये. मुलाबाळांचा कुटु़बांचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका.

जरांगेंचा लढा गांभीर्यानं घेतला

आम्ही कुणालाही फसवणार नाही उसवू इच्छित नाही. सरकारने जनतेला फसवलं हे आम्ही होऊ देणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत. याबाबत सर्व यंत्रणा काम करत आहे. जरांगे पाटलांच्या तब्येतीचीही आम्हाला काळजी आहे.

मराठा समाजाचा जरागे पाटलांचा लढा हा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. कारण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळावं ही आमची भावना आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT