CM Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : आरक्षण देणारच, शिंदे सरकारचा निर्धार; उचललं महत्त्वाचं पाऊल

आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

वैष्णवी कारंजकर

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारकडून मांडण्यात आली आहे.

यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग नेमून विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण परत करण्यात यावे असेही ठरले.

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, तसेच आमदार प्रवीण दरेकर, माजी न्या. एम जी गायकवाड, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, एड विजय थोरात, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची बैठक झाली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करतांना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या ३१०० उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. सारथीच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Discharge : कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उचलले! 6 हजार क्युसेकने विसर्ग सुरू; कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

‘मुझको राणाजी माफ करना…’ 30 वर्षांपूर्वीच्या गाण्याचा रिमेक, ममता कुलकर्णी म्हणाल्या...'त्यावेळी दोन दिवसांची रिहर्सल आणि..'

Latest Marathi News Live Update : ओबीसी आरक्षणाचा पेच सुटणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच; १२ हजार ग्रामपंचायतींसह २० जिल्हा परिषदांसाठी तयारी सुरू

Nagpur Extortion Case: दोन लाखांच्या खंडणीसाठी हल्ला; तोतया पोलिसासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Crime: आयुष पुगलियाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; मृतक गाजलेल्या कुश कटारिया हत्याकांडातील आरोपी

SCROLL FOR NEXT