maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण...'', जरांगे पाटील उपोषण सोडणार का?

संतोष कानडे

जालनाः मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गुन्हे मागे घेतले, तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आता गठीत केलेल्या समितीला वेळ द्यावा आणि समितीमध्ये जरांगे पाटलांनी इच्छा असेल तर यावं, असं म्हणत उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

त्यानंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही एक काय दोन पावलं मागे यायला तयार आहोत. खात्रीशीरपणे त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा शब्द दिला तर आम्ही विचार करु परंतु वेळकाढूपणा करायचा असेल तर आम्ही ऐकणार नाहीत. उद्या दुपारी २ वाजता याबाबत निर्णय जाहीर करु, असं जरांगेंनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, सध्या मला काही सुचत नाहीये. याबाबत उद्या निर्णय जाहीर करु. सरकारला कशाला वेळ पाहिजे, हे बघायला पाहिजे. एक काय दोन पावलं मागे मागे येण्यासाठी मी तयार आहे. सरकारच्या समितीमध्ये आमचं कुणीही जाणार नाही. गुन्हे मागे घेतले त्या निर्णयाचं स्वागत करतो.

''आमचा विषय महाराष्ट्राचा आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ पाहिजे की वेळ मारुन नेण्यासाठी वेळ पाहिजे, हे कळलं पाहिजे. आम्हाला खात्रीलायक सांगितलं की, आम्हीही उपोषणाबाबत विचार करु. वेळ लागला तर हरकत नाही परंतु टिकणाऱ्या आरक्षणाची शंभर टक्के खात्री पाहिजे.'' असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

त्यामुळे उद्या ते उपोषण सोडतील, असं दिसून येतंय. सरकारने खात्रीशीरपणे त्यांना शब्द दिला तर विचार करु, असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. शिवाय आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: “कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे हक्क…” ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय? 2018 चा निर्णय फेटाळला

शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का', राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाला दिली साथ

Martyr Vikas Gavade: कुटुंबीयांचा हंबरडा हृदय पिळवटणारा! हुतात्मा जवान विकास गावडेंना अखेरचा निरोप; बरडमध्ये पालखी तळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना त्यांच्याच व्हिडीओतून दिलं उत्तर, ३ मिनिटांचा VIDEO दाखवला

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा देखील शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT