Manoj Jarange Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनीही त्यांना वारंवार उपोषण करण्यावरुन झापलं आहे. Manoj Jarange Health Updates

डॉक्टरांनी जरांगेंच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्यात रक्तातील शुगर वाढलं दिसून आलं आहे. यावरुन डॉक्टरांनी जरांगेंना वारंवार उपोषण करत असल्यानं कडक शब्दांत सूचना केल्या. शुगर कमी होण्याऐवजी वाढली कशी? असा सवालही डॉक्टरांनी त्यांना केला.

दरम्यान, मनोज जरांगे हे सध्या वर्षभरात सहाव्यांदा उपोषणला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसंच मराठा समाजाला सगेसोयरे या तत्वावर सरसकट आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे. जर सरकार या मागण्या पूर्ण करणार नसेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून सरकारविरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT