Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: उद्यापासून प्रमाणपत्र वाटपास सुरुवात? मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय! CM शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू

मराठा आरक्षणाबाबत आज चंद्रकांत पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर काही भागांमध्ये शांततेत आंदोलन सुरू आहे, दरम्यान आज यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत या बैठकीनंतर मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे.

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषणाला बसलेत. त्याच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे.

तर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षण उपसिमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे याची प्रतीक्षा आहे. उपसमितीसोबतच्या या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT