Maratha Reservation Manoj Jarange-Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : अंतरवाली सराटीनंतर आता फलटण, दहिवडीत धडाडणार जरांगेंची तोफ; काय बोलणार? सभेकडं राज्याचं लक्ष

मनोज जरांगे- पाटील यांच्या हाकेला ओ देऊन संपूर्ण मराठा समाज अंतरवाली सराटीत एकवटला होता.

सकाळ डिजिटल टीम

फलटणनंतर माणमध्ये होणारी सभा ही मनोज जरांगे- पाटील यांची या दौऱ्यातील शेवटची सभा असेल.

फलटण शहर/दहिवडी : न भूतो न भविष्यती सभा घेतलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची तोफ शुक्रवारी (ता. २०) फलटण आणि दहिवडीमध्ये धडाडणार आहे. फलटण येथे सायंकाळी साडेसात वाजता, तर ती सभा आटोपल्‍यानंतर दहिवडी येथे रात्री त्‍यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या (Maratha Kranti Morcha) समन्‍वकांनी दिली आहे.

मनोज जरांगे- पाटील यांच्या हाकेला ओ देऊन संपूर्ण मराठा समाज अंतरवाली सराटीत एकवटला होता. या सभेत त्यांनी सरकारला आरक्षणाबाबत इशारा देऊन दहा दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात केली.

सातारा जिल्ह्यात मनोज जरांगे- पाटील येणार हे निश्चित होते; पण सभेचे ठिकाण अंतिम होत नव्हते. मात्र, अंतिम क्षणी माणकरांनी त्यांच्या सभेचा मान पटकावला. मराठा समाजातील सर्वसामान्य तरुणांनी तालुक्यातील मराठा समाजाच्या गावांना सोबत घेऊन सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन माणमध्ये सभेसाठी येण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन ते दहिवडीत येणार आहेत.

फलटणनंतर माणमध्ये होणारी सभा ही मनोज जरांगे- पाटील यांची या दौऱ्यातील शेवटची सभा असेल. त्यानंतर ते गावी जाऊन २४ ऑक्टोबरपासूनच्या संभाव्य बेमुदत उपोषणाची तयारी करणार आहेत. त्यामुळे फलटण आणि माणमध्ये ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT