maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Reservation : जरांगेंच्या शिष्टमंडळाला सरकारकडून 'हे' दोन प्रस्ताव?, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः मागच्या दहा दिवसांपासून जालन्याच्या अंतरवाली गावात मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. गुरुवारी राज्य शासनाने एक जीआर काढून काही प्रमाणात त्यांची मागणी मान्य केली, मात्र यानंतरही जरांगे उपोषणावर ठाम आहेत.

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मनोज जरांगे पाटलांचं एक शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळाला सरकारकडून दोन प्रस्ताव दिले जातील,असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

काय असतील दोन प्रस्ताव?

1. पहिल्या प्रस्तावानुसार राज्य सरकार 'वंशावळ' या शब्दाबद्दल जरांगेंच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. वंशावळ हा शब्द काढून टाकता येईल का याची चाचपणी करण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारने माजी न्या. संदीप शिंदेंच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. समितीत अपर मुख्य सचिव (महसूल), प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मराठवाड्यातील जिल्हाधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. तर औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त हे सदस्य सचिव असतील. हीच समिती वंशावळ या शब्दाबद्दल चाचपणी करणार, असं सरकारच्यावतीने सांगितले जाईल.

2. राज्य मागासवर्गीय आयोगाची घोषणा करण्याचे आश्वासन देण्यात येईल. 'मराठा-कुणबी, कुणबी-मराठा' हा मुद्दा केवळ मराठवाड्यापुरात मर्यादित आहे. इतर जिल्ह्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. त्यासाठीचा अधिकार आयोगाला असतो. म्हणून मागासवर्ग आयोगाची घोषणा करू, असं आश्वासन सरकार शिष्टमंडळाला देऊ शकतं.

जरांगेंच्या टीममध्ये कोण कोण आहे?

शिष्टमंडळात मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने किरण सुभाष तारख (रा.अंतरवाली सराटी),पांडुरंग वसंतराव तारख (रा.अंतरवाली सराटी), श्रीराम कुरणकर (रा.कुरण) हे बाजू मांडतील.

बैठकीतील अन्य प्रतिनिधी

शासनाचे प्रतिनिधी म्हणून अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गोंदी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप एकसिंगे, माजी कुलगुरू व तज्ज्ञ संजय निमसे, माजी मंत्री अर्जुन खोतकर हे उपस्थित असतील. तर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.

१० दिवसात काय काय घडलं?

दहा दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं होतं. शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी आंदोलक आणि उपोषणकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली अन् आंदोलन चिघळलं. पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली. दुसऱ्याच दिवशी शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलकांची भेट घेतली.

त्यानंतर सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरु झाल्या. मंत्री गिरीश महाजन आणि अर्जुन खोतकर यांनी सरकारच्या वतीने आंदोलकांशी चर्चा सुरु ठेवली. सरकारने उपसमितीची बैठक घेऊन एक महिन्यात निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. तरीही जरांगे ठाम होते. मग गुरुवारी यासंदर्भातला जीआर निघाला. आज (शुक्रवारी) जरांगेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT