Maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha reservation: मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

धनश्री ओतारी

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी 14 ऑगस्ट 2022 रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे या बैठकीसाठी मुंबईत येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. मेटेंच्या मृत्यू नंतर ही बैठक रद्द करण्यात आली होती. आज पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.(Maratha reservation will be resolved Important meeting of Chief Minister Eknath Shinde with Sambhajiraje Bhosale )

आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 संघटना आणि 50 मराठा समन्वयकांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आले आहे. मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. या आधी अशोक चव्हाणांकडे हे अध्यक्षपद होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

ओबीसींपाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्या शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सुरूवातील नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला गेला. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टातला संघर्ष सुरू झाला. मात्र गेले अनेक वर्षे प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारला अपयश आलं आहे. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना मराठा समजालाही आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT