महाराष्ट्र

राज्यातील ७७ हजार शाळा ‘यू-डायस प्लस ऑनलाइन’मध्ये सज्ज

उमेश काटे



अमळनेर : केंद्र सरकारच्या (Central Government) माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या ‘यू-डायस प्लस’ ऑनलाइन प्रणालीमध्ये (‘U-Dias Plus’ online system) राज्यातील सर्व शाळांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्यातील एक लाख दहा हजार ५२५ पैकी ७७ हजार ८८६ शाळांनी ऑनलाइन माहिती पूर्ण भरलेली आहे. ऑनलाइन माहिती भरण्याबाबत गोंदिया (Gondia) , रायगड (Raigad) व जळगाव (Jalgaon) जिल्हे आघाडीवर असून, ते राज्यात ‘टॉप थ्री’मध्ये आहेत. सद्यःस्थितीत १२ हजार ६६५ शाळांचे माहिती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यातील १९ हजार ९७४ शाळांनी मात्र माहिती भरण्याकडे पाठ केली असून, त्या शाळांनी अजूनही माहिती भरायला सुरवात केलेली नाही, हे विशेष!

(state schools fill out ‘U-Dias Plus Online’ information)


देशामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाउनची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. राज्यातील सर्व शाळांची माहिती शाळास्तरावरून यू-डायस प्लस प्रणालीमध्ये ऑनलाइन संगणकीकृत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड-१९ चा विचार करता केंद्र सरकारकडून २०१९-२० या वर्षामध्ये विकसित केलेल्या प्रपत्रानुसार २०२०-२१ च्या प्रपत्रामध्ये काहीही बदन न करता शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची, शिक्षक, विद्यार्थी, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती ऑनलाइन पद्धतीने यु-डायस प्लस प्रणालीत भरण्यासाठी शाळांना १५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्हा व राज्यस्तरावर ३० मेपर्यंत माहिती अपडेट केली जाणार आहे.

अनुदान मंजुरीसाठी होणार उपयोग
यू-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता होणार असून, याच माहितीच्या आधारे केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान मंजुरी देण्यात येणार आहे. यू-डायस प्लस प्रणालीमधील माहितीचा उपयोग वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे, तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करण्याकरिता, तसेच राज्याचा शैक्षणिक निर्देशांक देशपातळीवर निश्‍चित करण्याकरिता केला जाणार आहे.


माहिती भरणाऱ्या जिल्ह्यांची स्थिती
जिल्हा एकूण शाळा पूर्ण शाळा टक्केवारी

गोंदिया १ हजार ६६७ १ हजार ५७० ९४.१८
रायगड ३ हजार ७१३ ३ हजार ३४७ ९०.१४
जळगाव ३ हजार ४०८ ३ हजार ०६२ ८९.८५
भंडारा १ हजार ३२३ १ हजार १८८ ८९.८०
सातारा ३ हजार ८८३ ३ हजार ३९७ ८७.४८
ठाणे ४ हजार ९७६ ४ हजार १०० ८२.५८
नाशिक ५ हजार ६४० ४ हजार ६३३ ८२.१५
सिंधुदुर्ग १ हजार ७११ १ हजार ३९८ ८१.७१
बुलडाणा २ हजार ४९३ १ हजार ९९८ ८०.१४
सांगली २ हजार ९८२ २ हजार ३६९ ७९.४४

नाशिक विभाग
जिल्हा अद्याप माहिती न भरणाऱ्या शाळा
नगर १ हजार १६९
नंदुरबार ७५४
नाशिक ५३५
धुळे २८१
जळगाव ९१
एकूण २ हजार ८३०

(state schools fill out ‘U-Dias Plus Online’ information)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT