Rajesh Tope esakal
महाराष्ट्र बातम्या

मास्कमुक्त महाराष्ट्रावर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण म्हणाले, कोरोनाचा धोका टळलेला नाही...

ग्रामीण भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही; राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील कोरोना (Corona)रुग्णांची संख्या कमी होत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची (Maharashtra) चर्चा कालपासून सुरू झाली आहे. यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज स्पष्टीकरण दिले.

राज्यातील काही भागांमध्ये अजूनही रूग्णसंख्या वाढत आहे. शहरातील रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी ग्रामीण भागात आजही रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र हे रूग्ण पाच ते सात दिवसांच्या उपचारानंतर बरे होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मास्कमुक्त महाराष्ट्र याविषयी ते म्हणाले, रूग्ण संख्या कमी होत असली तरी इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? या देशांतील पार्श्वभूमीवर आपल्याकडे जे नियम आहेत त्यात काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यामुळे मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हणालो नाही. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे टास्क फोर्सने याबाबत मार्गदर्शन करावे. राज्यातील निर्बंध अजून किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळाले तर त्याविषयी लोकांनाही दिलासा मिळू शकेल.त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्त महाराष्ट्र यावर कोणतीही चर्चा नाही" असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन व्हेरियंट संदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले, सध्या नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. नवा व्हेरियंट जास्त घातक आहे अशी माहिती मिळत आहे. परंतु नवीन व्हेरियंटचा रुग्ण अजून कुठेच आढळला नाही. त्यामुळे जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT