Water Supply Through Tankers esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : राज्यात सर्वाधिक 103 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : राज्यातील २९ गावे आणि ५६ वाड्यांसाठीचे सहा टँकर प्रशासनातर्फे बंद करण्यात आले आहेत.

मात्र, ऐन सणासुदीच्या दिवसांत उन्हाच्या तडाख्याबरोबर घश्‍याची कोरड वाढत चालली. राज्यात सर्वाधिक १०३ टँकरद्वारे जिल्हावासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. (Maximum water supply through 103 tankers in state nashik news)

एका आठवड्यात आठ गावे आणि ११२ वाड्यांसाठी १६ टँकरची वाढ प्रशासनाला करावी लागली. जिल्ह्यातील १०६ गावे आणि २५३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. धुळे जिल्ह्यातील एका गावासाठी एक, जळगाव जिल्ह्यातील १३ गावांसाठी १४ टँकर सध्या सुरू आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील १२० गावे आणि २५३ वाड्यांसाठी ११८ टँकर धावताहेत.

दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एक टँकर वाढला असला, तरीही साताऱ्यातील २२, सांगलीतील दोन, सोलापूरमधील दोन असे एकूण २५ टँकर बंद करण्यात आले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील १०४ गावे आणि ६६८ वाड्यांसाठी ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगरमधील ५५ गावे आणि दोन वाड्यांसाठी ५९, जालन्यातील १६ गावे व १३ वाड्यांसाठी २८ टँकर कायम ठेवण्यात आले आहेत. राज्यातील २९५ गावे आणि ९३६ वाड्यांसाठी ३१८ टँकर सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

SCROLL FOR NEXT