Kishori Pednekar Sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपाच्या उधारीवर मनसेच्या सभा; महापौर पेडणेकरांचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबादेत सभा घेणार असून आज पुण्यातून पूजापाठ करुन ते निघाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबादेत सभा घेणार आहेत. त्यासाठी आज पुण्यातून पूजापाठ करुन ते निघाले आहेत. वढू येथील संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन ते आता औरंगाबादला रवाना झाले असून त्यांच्या या दौऱ्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे.

मनसेवर निशाणा साधत पेडणेकर म्हणाल्या की, मनसे हा मुळात भाजपाचा चेहरा आहे. भाजपाचे अनेक चेहरे आता बाहेर आले आहेत. भाजपाच्या उधारीवर मनसे सभा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनसे आणि भाजपा हे विकासाच्या दृष्टीकोनातून बरोबरी करु शकत नाहीत त्यामुळे ते आता हिंदुत्वाचं कार्ड चालवत आहेत. ते आमच्या हिंदुत्वाच्या गप्पा करतात पण मुळात हिंदुत्व सोडलंय कुणी? हे बघायला पाहिजे. शिवसेना कायम गदाधारी राहिला आहे असं त्या बोलताना म्हणाल्या.

ज्यांच्याकडे परवानगी नाहीय त्यांनी भोंगे काढायचेच आहेत पण मनसेच्या या भूमिकेमुळे त्यांनी आरत्या व भजन यांना रोख लावण्याचं काम केलं आहे. हिंदूंची जास्त मंदिरे महाराष्ट्रात आणि देशात आहेत पण त्यांना रोख लावायचं काम मनसे आणि भाजपा करत आहेत. असा आरोप करत त्या म्हणाल्या की, राज्याला संयमी नेतृत्व मिळाले आहे, मुख्यमंत्र्यांनी कधी भडकावू भाषणं केले नाहीत त्यामुळे त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि मुंबईची लोकं आहेत असं त्या म्हणाल्या.

वडिलांच्या मालमत्तेतला वारसा हक्क मुलालाच मिळतो. वडिलांनी केलेली चांगली किंवा वाईट कर्म मुलालाच मिळतात ना? की तुमच्या मुलाची मालमत्ता तेजसच्या नावे करणार आहात? असा सवाल करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT