CM Eknath Shinde Get Doctorate Degree  
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंना डॉक्टरेट मिळाली म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय; शिवसेनेच्या महिला नेत्याचा ठाकरे गटावर निशाणा

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली

धनश्री ओतारी

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, शिंदे गटाने म्हणजेच शिवसेनेने पत्रकार परिषद घेत या सर्व घटनेवर स्पष्टीकरणं दिलं. अशातच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. (Meenakshi Shinde on CM Eknath Shinde Get Doctorate Degree maharashtra politics )

नुकतंच, नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापनातील त्यांचं उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. त्यानंतर राज्यात विरोधकांडून मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेचा भडीमार सुरु आहे.

दरम्यान, आज शिवसेनेच्या पदाधिकारी मिनाक्षी शिंदे यांनी हाच मुद्दा पकडत विरोधाकांवर निशाणा साधला. डॉक्टरेट मिळाली म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय. अशा शब्दात शिंदे यांनी निशाणा साधला.

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभा नेरुळच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT