Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : मातोश्रीवरील चार डाकू उद्धव ठाकरेंना..; शिंदे गटातील मंत्र्यानं केलं मोठा गौप्यस्फोट

गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ संघर्ष करुन शिवसेना वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र..

सकाळ डिजिटल टीम

सातारा : शिवसेना पक्षात काम करताना अनेकदा आमच्यावर गुन्हे दाखल झाले. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ संघर्ष करुन शिवसेना वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, आता मातोश्रीवरील चार डाकू उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) चुकीचं मार्गदर्शन करताहेत, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला.

चुकीच्या मार्गदर्शनामुळंच शिवसेनेची वाताहत झाली आहे. उध्दव ठाकरेंनी जुन्या कडीला उत आणण्याचं थांबवून राज्याच्या विकासावर बोलावं, अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व पाणी पुरवठा योजनांचं ई-भूमिपूजनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री व शिंदे गटाच्या आमदारांवर केलेल्या टीकेबाबत पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

संजय राऊत हे साधे नगरसेवक म्हणूनही निवडून आलेले नाहीत. शिवसेनाप्रमुख व शिवसेनेच्या आमदारांच्या जीवावर आत्तापर्यंत त्यांना थेट संधी मिळाली आहे. शिवसेना पक्ष हा संघर्षातून उभा राहिला होता. मात्र, संजय राऊतांसारख्या माणसांमुळं या पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे, असंही पाटील म्हणाले.

उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर व शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करण्यात वेळ घालवू नये. याचबरोबर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांवर हल्ला होणे चुकीचे असून आदित्य ठाकरे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी पोलीस यंत्रणेमार्फत होईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT