Minister Narayan Rane Rajapur Sabha esakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील; भरसभेत राणेंचं मोठं विधान

कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही.

सकाळ डिजिटल टीम

तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या काळात जो विकास झाला नाही तो विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षामध्ये केला आहे.

राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने कोकण विकासासाठी भरीव निधी दिला.

मात्र, गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यासह कोकणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने काय दिले, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगामध्ये प्रगतिशील देश म्हणून नावारूपास येत असून मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत साऱ्‍यांनी साथ देण्याचे आवाहनही केले.

शिवसेनेवर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार टीका करताना आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील असा सुतोवाच केले. गेल्या नऊ वर्षामध्ये झालेला विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महासंपर्क अभियान राबविण्यात येत असून राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या जाहीर सभेमध्ये राणे यांनी ठाकरेंवर प्रहार केला.

व्यासपीठावर त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, अभियान राज्य प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, राजन तेली, बाळ माने, अनिकेत पटवर्धन, शिल्पा मराठे, उल्का विश्‍वासराव आदींसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्हणाले, ‘‘केंद्रातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या काळात जो विकास झाला नाही तो विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षामध्ये केला आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यासह कोकण विकासासाठी नेमकं काय केले, राज्याचे कोणते विकासात्मक प्रश्‍न सोडविले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून शिवसेना आता संपलेली आहे.

त्याचा जास्त विचार करू नका. त्यांच्यासोबत असलेले खासदार आणि आमदारही आगामी निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार नाहीत. लोकांना आता भाजपची गरज असून समाजातील सर्व घटकांसह तळागाळामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पोहचवा.’’

बांधकाममंत्री चव्हाण यांनी देश, राज्य आणि कोकण यांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती दिली. अभियान राज्य प्रभारी आमदार दरेकर, शेलार, आमदार राणे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देश आणि राज्यामध्ये झालेल्या विकासाचा लेखाजोगा मांडत आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT