Radhakrishna Vikhe Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

सध्याची अवस्था पाहता काँग्रेस पक्षात राहावं, असं कोणाला वाटेल? राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

'भाजपकडं नरेंद्र मोदी यांच्यासारखं वैश्विक नेतृत्व आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'भाजपकडं नरेंद्र मोदी यांच्यासारखं वैश्विक नेतृत्व आहे.'

सांगली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडं (Congress President Election) अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपद हे गांधी घराण्याबाहेर जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. मात्र, या निवडणुकीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बोचरी टीका केलीय.

सध्या काँग्रेसला देशात नेतृत्व राहिलेलं नाही. राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना जी काही अवस्था सुरू आहे, ती पाहता त्या पक्षात राहावं, असं कोणाला वाटेल, असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सांगली जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजारग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला.

या वेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सीईओ जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, 'भाजपकडं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखं वैश्विक नेतृत्व आहे. त्यामुळं भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्याबाबत योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले जातील.'

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा करण्यापेक्षा सध्या पक्षाचे काँग्रेस छोडो सुरू आहे, त्यावर काम करणं गरजेचं असल्याचंही विखे यांनी सांगितलं. भाजपमध्ये सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना दुसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली आहे. त्यांनी अनेक भाजप ज्येष्ठ नेत्यांना ओव्हरटेक केलं आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘माझा आत्तापर्यंतचा अनुभव आणि विविध खात्यांत केलेले काम पाहता भाजपनं मला ही संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली मी दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT