Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

जालिंदर सत्रे

निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघाची लढत लक्षणीय झाली.

पाटण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघाची लढत लक्षणीय झाली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध युवानेते सत्यजितसिंह पाटणकर या प्रतिष्ठेच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे सत्यजितसिंह पाटणकर यांनी बाजी मारली व मंत्री देसाई यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

१०३ मतदार असणाऱ्या सोसायटी मतदार संघात एक मतदार मयत असून मतदानादिवशी १०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५७ मतदार पाटणकरांचे, तीन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तर ४२ देसाईंचे असे मतदारांचे बलाबल होते. त्यापैकी सत्यजितसिंह पाटणकरांना निवडणुकीत 58 मते, तर मंत्री शंभूराज देसाई यांना 44 मते मिळाली. या निवडणुकीत ग्रामीण गृहराज्यमंत्री मंत्री देसाई यांना पराभवास सामोरे जावे लागले.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रत्येक गोष्टीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी जातीने लक्ष घातल्याने व नियोजन पद्धतीने मतदारांना खबरदारीचा उपाय म्हणून टूरवर नेल्याने गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधातील विजय सोपा झाला. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन विजय साजरा केला. गृहराज्यमंत्र्याच्या विरोधातील या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी

एकूण मते -            103        

झालेली मते -          102

उमेदवार                    मिळालेली मते

शंभूराज देसाई                    44

सत्यजितसिंह पाटणकर      58

विजयी उमेदवार - सत्यजितसिंह

मतांचे लीड - 7

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E22, E25, E27 पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय! तुमच्या कार-बाईकवर काय परिणाम होणार? मायलेज, इंजिन आणि किंमतीबाबत जाणून घ्या

Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

Auspicious June 2026: यंदाचा जून महिना धार्मिकदृष्ट्या विशेष; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : जसपाल राणा यांचे निधन ही क्रीडा विश्वासाठी मोठी हानी: पंतप्रधान मोदी

Mumbai Traffic : मुंबईत प्रवास करताय? LBS मार्गावर 'या' तारखेपर्यंत रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद; घरून निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या

SCROLL FOR NEXT