NCP Mla Disqualification case Esakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार अपात्रता सुनावणीवेळी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; स्पष्टीकरण देत म्हणाले, 'पुढील निवडीपर्यंत...'

NCP Mla Disqualification case :राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. आज या सुनावणीवेळी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरण प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मागच्यावर्षी फूट पडली. त्यानंतर पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले.

शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो, तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. आज या सुनावणीवेळी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. (NCP Mla Disqualification case)

अजित पवार गटाच्या वकिलांकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील यांची निवड ३ वर्षांसाठी केली जाते. २०२२ सालीच जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष कार्यकाळ संपला होता, असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुमारे ३ वर्षांसाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. तर पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरु राहतो, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी सुनावणीवेळी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT