Sharad Pawar-Shashikant Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

'शरद पवारांवर टीका करणाऱ्यांच्या बुध्दीची किव येते'

ऋषिकेश पवार

'शरद पवारांना बदनाम करण्याचं पाप आपण करत आहात.'

विसापूर : रयत शिक्षण संस्थेची (Rayat Shikshan Sanstha Satara) कार्यप्रणाली आणि देश पातळीवरील जाणते नेतृत्व म्हणून नावलौकिक असणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांचं कार्य जनतेला चांगलंच माहित आहे. मात्र, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी काही जण रयत शिक्षण संस्था आणि पवार साहेबांवर टीका करत आहेत. आपली उंची किती, आपण कुणावर आणि किती बोलतो, याची जाण नसणाऱ्यांच्या बुध्दीची किव येत असल्याचा प्रतिटोला आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी लगावला.

पुसेगाव येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. अपघाताने निवडून येवून आमदार झालेल्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. शरद पवार आणि ‘रयत’वर टीका करणाऱ्यांच्या बालिश बुध्दीचा प्रत्यय येतो. आपली उंची किती, पात्रता किती आणि पवार साहेबांचे कार्य आणि उंची किती, त्यांचे राज्यातील आणि देशातील योगदान किती, आपण कधी एखादी संस्था चालविली आहे का, अशी प्रश्नांची मालिकाच शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केली. ते म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धेच्या युगात कर्मवीरांच्या पश्चात आधुनिक शिक्षण प्रणाली सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पवार साहेबांनी दूरदृष्टीने अनेक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. पवार साहेबांकडे अध्यक्षपद आल्यावर ‘रयत’ची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळली आहे. कोरोना काळात १५ ते २० कोटींचा निधी उपलब्ध करुन संस्थेच्या सर्व शाळांमध्ये संगणक आणि इतर आधुनिक शिक्षण साधने उपलब्ध करुन दिली आहेत.’’

आत्ता जिल्हा बॅंकेत संचालक झालेल्या त्यांच्याच सहकाऱ्याकडूनही त्यांनी माहिती घ्यावी. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ‘रयत’ला उभारी दिली, कोट्यावधींचे अनुदान आणि निधी दिला असताना आपण संस्थेत भ्रष्टाचार झाला, नोकरीसाठी पैसे घेतले जातात असे म्हणता, बारामतीचे लोक संस्थेत घेतले जातात असे सांगता, हे चुकीचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. एका तक्रारीवरुन पवार साहेबांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यावर कारवाई केली. ‘रयत’चा परिवार ज्या नेतृत्वाने राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविला. त्यांच्या कार्याचे मोजपाप करण्याची आपली उंची नाही, अशी टीकाही शशिकांत शिंदेंनी केली. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये जिल्ह्यासह राज्यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. अनेक अनाथ विद्यार्थ्यांची जबाबदारी तेथे घेतली जाते. राष्ट्रवादी वेलफेअर फंड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत अनेक विद्यार्थ्याची जबाबदारी घेतली जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.

ज्यांनी रयत शिक्षण संस्थेला देव मानले, ज्यांनी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य केले. त्यांना आणि संस्थेला बदनाम करण्याचे पाप आपण करत आहात. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करुन आपण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहात, याची किव येते.

- शशिकांत शिंदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT