महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंच्या भेटीत काय झाली चर्चा? भाजपचे कृपाशंकर सिंह म्हणतात...

आज भाजपा नेते कृपाशंकर सिंह हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

आज भाजपा नेते कृपाशंकर सिंह हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.

आज भाजपा नेते कृपाशंकर सिंह हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्या या भेटीमुळे मनसे-भाजप युतीची चर्चा होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. दरम्यान, भाजपाच्या कृपाशंकर सिंह यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. नातीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी राज ठाकरे यांना भेटायला गेलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पुढे कृपाशंकर सिंह म्हणाले, नातीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही वेळ मागितली आहे. त्यांच्याकडून वेळ मिळाला की, तातडीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटुन त्यांनाही पत्रिका देणार आहे. शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाच्या भूखंडाजवळ आरएसएने दावा केला आहे. यासंदर्भात ते म्हणाले, ते शिवसेनेचे शक्तीस्थळ आहे. ते कधीच कोणाला देऊ शकत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुसऱ्या जागेची मागणी केली आहे. त्याचा विचार महानगरपालिका करेल आणि त्यावर योग्य तो निर्णय देईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे मागील काही दिवसांपासून त्यांचे नाव राजकीय वर्तुळात चांगलेचं चर्चेत आहे. कृपाशंकर सिंह आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे आज राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सिंह यांनी यासंदर्भात खुलासा केल्याने चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, महापालिकेनं १९६७ सालापासून संबंधित भूखंड संघाला भाडेतत्वावर दिला होता. संघानं २००७ पर्यंत या भूखंडाचं भाडं भरलंय. या भूखंडावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे. दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत असल्यामुळे संघाची शाखा भरविण्यात अडचण येत आहे, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये पर्यायी मोकळा भूखंड संघाला देण्यात यावा, अशी मागणी संघानं केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT