MNS chief Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Latest News : महाराष्ट्रात काय चाललंय बघताय ना, सरडेसुद्धा लाजतील; राज ठाकरेंचा कोणावर घाव?

राज्यात आता राजकारणाची पातळीच घसरली आहे. त्यामुळे एकवेळ घरात बसेन; पण अशी तडजोड करणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात जो व्यभिचार सुरू आहे तो बघा, असला व्यभिचार आपण करणार नाही. एकीकडे नाणारला जन्म घातला आणि दुसरीकडे बारसूचं पाच दिवसांत बारसं केलं.

Chiplun News : ‘भाजपला (BJP) काँग्रेसची (Congress) विचारसरणी पटत नाही म्हणून त्यांच्याशी तडजोड केली जात नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कोणत्या विचारसरणीचे आहेत, ज्यामुळे त्यांच्याशी राजकीय तडजोड केली, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्यात आता राजकारणाची पातळीच घसरली आहे. त्यामुळे एकवेळ घरात बसेन; पण अशी तडजोड करणार नाही,’ असंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे दोन दिवस रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

गुरुवारी सकाळी बहादूरशेखनाका येथे राज ठाकरे यांचे स्वागत झाल्यावर मार्कंडी येथील मनसेच्या कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यानंतर अतिथी सभागृहात जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. जे एकमेकांविरोधात भांडले तेच सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. सगळा व्यभिचार सुरू आहे. त्यामुळे एकवेळ घरी बसेन; पण राजकीय तडजोड करणार नसल्याचे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

येत्या १५ दिवसांत मुंबईत पक्षाचा मेळावा घेतला जाणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मनातील खदखद त्या मेळाव्यात व्यक्त करणार, असे सांगितले. पदावर असलेल्यांनी काम न केल्यास त्याला पदावरून काढले जाते. मुख्यमंत्र्याने जर काम व्यवस्थित केले नाही तर त्याला पूर्वी बदलले जात होते. सध्या महाराष्ट्रात काय चालले बघताय ना, सरडेसुद्धा लाजतील, अशा पद्धतीने मुख्यमंत्री बदलले जातात.

गेली १६ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. एकातरी खासदाराने यावर आवाज उठवला का? कोणी गडकरींना भेटला का? मग कशासाठी हवी खासदारकी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे तो बघा, असला व्यभिचार आपण करणार नाही. एकीकडे नाणारला जन्म घातला आणि दुसरीकडे बारसूचं पाच दिवसांत बारसं केलं.

कोणाच्या या जमिनी, त्या कशा घेतल्या गेल्या, हे जनतेला लक्षात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीनेच धुमाकूळ सुरू आहे. त्याला सीमाच राहिलेली नाही, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं. या वेळी सरचिटणीस शिरीष सावंत, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कोकण संघटक वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.

फडणवीस यांची नक्कल

काँग्रेसशी कधीही मैत्री करणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले होते; मात्र त्या वाक्याच्या शेवटी नेहमी कलाटणी देत असल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांची नक्कल केली. यावर सभागृहात जोरदार हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT