Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: “सुषमाताई, बाळासाहेबांची नाक घासून माफी कधी मागणार?”, मनसेचं अंधारेंना थेट पत्र

सुषमा अंधारे यांच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या

सकाळ डिजिटल टीम

वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘‘माझ्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागते,’’ असे सांगत यावर पदडा टाकला आहे.

सुषमा अंधारे यांच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. त्यामध्ये संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या संदर्भाने केलेली वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी या मागणीने जोर धरला होता. त्यासंदर्भात अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती.

त्यानंतर आज 'आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत! आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार ??' असं पत्र मनसेने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना लिहिलं आहे. सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या बाबत ‘ म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग?’, असं वक्तव्य केल्याचा दावा करत मनसे सचिव प्रवक्ते योगेश खैरे यांनी हे खरमरीत पत्र लिहिलं आहे.

काय लिहालं आहे योगेश खैरे यांच्या पत्रात?

सुषमाताई अंधारे….!

आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत! आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार ??

संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आहे…. आक्षेपार्ह हावभाव आणि हीन वक्तव्य करत या परंपरेचा तुम्ही अपमान केला होता. पण ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संतांच्या शिकवणूकीनुसार वारकरी संप्रदायाने केलेल्या प्रहारामुळे तुम्ही माफी मागितलीत…. पण तीही तोडकी मोडकीच होती! ती मान्य करायची की नाही हे संप्रदायच ठरवेल !! असो….

त्याचप्रमाणे हिंदू देवता, हिंदू परंपरा, वंदनीय बाळासाहेब यांच्याबाबत सुद्धा तुम्ही अशीच भाषा वापरली आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण, हनुमान या देवता असतील किंवा नवरात्री सारखे हिंदू धार्मिक सण ज्यात महिला भगिनींच्या भावना आणि आस्था गुंतल्या आहेत त्याचाही तुम्ही टिंगल टवाळी करत अपमान केला! वंदनीय बाळासाहेबांबाबत ‘म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे ?’ असं अपमानस्पद वक्तव्य सुद्धा केलं होतं !

त्यामुळे आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची तुम्ही माफी मागणार आहात का नाही ? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची तर तुम्ही त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक घासून माफी मागायला पाहिजे…. ती कधी मागणार? खरंतर अशी माफी मागण्यासाठी शिवसैनिक आपल्या नेतृत्वाकडे आग्रह का धरत नाहीत याचंच आश्चर्य वाटतं !!

‘मी एकदा केलेलं वक्तव्य परत माघारी घेत नाहीत’ असं आपण म्हणाल्याचं ऐकण्यात आलं होतं…… पण तरीही अशा अपमानस्पद, भावना दुखावणाऱ्या, हीन वक्तव्यांची आपण माफी मागितलीच पाहिजे !

तोडकी मोडकी नव्हे तर खुल्या मनाने माफी कधी मागताय ते सांगा !

तुमच्याच दादाहो मधील एक…….

योगेश खैरे सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT