Mahayuti 
महाराष्ट्र बातम्या

MNS on Nawab Malik: 'नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण ढोंगीपणाचा 'नकाब'...; मनसेचा फडणवीसांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी अधिवेशनात हजेरी लावल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी अधिवेशनात हजेरी लावल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मलिकांवर देशद्रोहाचे आरोप असल्यानं त्यांना महायुतीत घेता येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतील आहे.

यावरुन विरोधीपक्षानं फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मनसेनं देखील फडणवीसांना टार्गेट करत आधी तुमचा ढोंगीपणाचा नकाबचा जवाब द्या असं म्हटलं आहे. (MNS on Nawab Malik matter challenge to Devendra Fadnavis to gives answer)

मनसेनं केलं ट्विट

मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात म्हटलं की, "इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? 'नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल. नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल! (Latest Marathi News)

नवाब मलिकांचं प्रकरण काय?

नवाब मलिक हे सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नवाब मलिक यांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावली इतकंच नव्हे ते थेट सत्ताधारी पक्षाच्या रांगेत जाऊन बसले. म्हणजेच त्यांचा अजितदादा गटाला पाठिंबा असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या दाखवून दिलं. (Latest Marathi News)

यानंतर विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना टार्गेट करताना तुम्ही आता देशद्रोह्यांचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात? असा सवाल केला होता. (Marathi Tajya Batmya)

फडणवीसांचं अजितदादांना पत्र

यानंतर दानवेंना प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी सवाल केला की, मलिकांवर देशद्रोहाचे आरोप झाले तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं त्यांना मंत्रीपदावरुन का हटवलं नाही. पण दिवसभरातील कामकाज संपल्यानंतर फडणवीसांनी थेट आपल्या ट्विटरहँडलवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांवर देशद्रोहाचे आरोप आम्ही केले होते ते सध्या या आरोपांखाली जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळं त्यांना महायुतीत घेता येणार नाही.

पण हे पत्र त्यांनी थेट अजितदादांपर्यंत न पोहोचवताना ट्विटरवरुन सार्वजनिक केलं. पण याचं मुळं फडणवीसांना टीकेला समोरं जावं लागलं. अजितपवार गटासह काँग्रेसनंही हे पत्र जगाला सांगायची काय गरज होती, थेट फोन करुनही फडणवीस ही बाब अजित पवारांना सांगू शकत होते. त्यामुळं त्यांच्या या कृतीमागं राजकीय ध्रुविकरणाचं राजकारण सुरु असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT