raj thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

...पण पेशव्यांनी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतलं नाही; राज ठाकरेंचा सेनेवर निशाणा

दत्ता लवांडे

मुंबई : शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्टिव्ह झाले असून त्यांनी काल पहिल्यांदाच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याचबरोबर आज त्यांनी जाहीर सभा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. यावेळी "मला पक्ष चिन्हाची आणि नावाची गरज नाही माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे त्या विचाराने मी पुढे जाणार" असं म्हणत शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

(Raj Thackeray Speech)

"वारसा हा वास्तूंचा नाही विचारांचा चालवावा लागतो. शिवाजी महाराजांनी जो विचार दिला तोच विचार पुढे पेशव्यांनी पसरवला पण कधी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतलं नाही, त्यांचं म्हणणं होतं की छत्रपती तेच, आम्ही फक्त त्यांचा विचार पोहोचवतो, असंच माझं आहे, मीही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे." असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला असून शिवसेनेवर बोचरी टीका केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी आपल्या शस्त्रक्रियेदरम्यानचे किस्से सांगत प्रेक्षकांना हसवलं. माझा शस्त्रक्रियेचा अनुभव खूप भयंकर होता. माझ्या शस्त्रकियेला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. कोरोनामुळं माझ्या हाडांचा आजार बळावलाय, असं त्यांनी मेळाव्यात स्पष्ट केलं.

त्याचबरोबर, राज्यातील टोलमधून येणार पैसा कुठं जातो असा सवाल करत महाराष्ट्रातील सत्ता माझ्या हातात देऊन बघा सगळे टोल बंद करून दाखवतो असंं आश्वासन राज ठाकरेंनी यावेळी दिलं. त्यांनी नुपूर शर्मा प्रकरणाबद्दल वक्तव्य करताना म्हटलं की, हिंदूंवर आक्षेपार्ह बोलणाऱ्याला वेगळा नियम का? झाकीर नाईक, ओवैसी हे कित्येकदा हिंदू देवीदेवतांविषयी आक्षेपार्ह बोलले आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT