MNS sandeep deshpande on uddhav thackeray open jeep address in balasaheb thackeray style shivsena row  
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : मराठी माणूस भावनिक आहे, मूर्ख नाही; ठाकरेंच्या 'त्या' बाळासाहेब स्टाइल भाषणावर मनसेचं टिकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव दोन्ही गमावल्यानंतर राज्यभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला तर उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम् चा नारा दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शैली वापरल्याचं देखील दिसून आलं. १९६८ साली बाळासाहेबांना दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना ओपन जीममधून मार्गदर्शन केलं.

मनसेची खोचक टीका...

बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाइलमध्ये उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याचा फोटो शेअर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे हे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "कर्तृत्वहीन माणसाला सहानुभूतीची गरज असते. पण लक्षात ठेवा मराठी माणूस भावनिक आहे मूर्ख नाही त्याला तुमची नाटकं माहित आहेत" अशी जहरी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते..

आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील.. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते असं थेट आव्हान देत धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो असे ठाकरे म्हणाले. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो उताणा पडला. या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही. खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT