Sanjay raut and Nawab malik 
महाराष्ट्र बातम्या

मियाँ-नॉटी आणि अधिकारी, सलीम-जावेदची जुगलबंदी; मोहित कंबोज यांची टीका

सकाळ डिजिटल टीम

समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले ते संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे आहेत.

मुंबई - राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या मुलींचे वाईन उद्योगाशी कनेक्शन असल्याचा आरोपही केला. आता यात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना डिवचलं आहे.

मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओ शेअर करून राज्यात सलिम जावेदची जुगलबंदी सुरु आहे आणि यात सलिम नवाब मलिक तर जावेद संजय राऊत असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोपावरून कंबोज यांनी टीका केली. नुकतंच समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई झाली. यातही संजय राऊत यांचे कनेक्शन असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले ते संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे आहेत.एकीकडे नवाब मलिक यांना कोर्ट फटकारत आहेत तर दुसरीकडे सलिम आणि जावेद आपले पर्सनल स्कोअर सेटल करत आहेत असंही कंबोज यांनी म्हटलं.

राज्यात सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग स्वतःची पर्सनली दुष्मनी काढण्यासाठी होतोय का?अधिकाऱ्यांसोबत असलेली नाती ही स्वतःची सेटलमेंट आणि पर्सनल स्कोअर वाढवण्यासाठी होतोय का? माझा आता राज्यातील जनतेला सवाल आहे की, चोरी करून आलेले हे सरकार ज्या पद्धतीने चालले आहे आणि पदाचा गैरवापर करत आहेत तसं योग्य आहे का? अशी टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT