crime Jitendra Awhad politics Allegation of molestation woman ajit pawar jayant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad Molestation case: विनयभंगाचं प्रकरणं अन् आता प्रियंका गांधींचा फोटो ट्विट; आव्हाड पुन्हा चर्चेत

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला असून यामध्ये त्यांना जामीनही मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळं राज्यात बराच राजकीय गदारोळ माजला. पण आता आव्हाडांनी यासंदर्भात नुकताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Molestation cases and now tweet Jitendra Awad again in discussion)

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं असून यामध्ये प्रियंका गांधी यांचा एका आंदोलनादरम्यानचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये प्रियंका गांधींना एक पुरुष पोलीस जबरदस्तीनं दूर ढकलताना दिसत आहे. या फोटोला आव्हाडांनी कॅप्शन दिलेलं नाही पण हॅशटॅग वापरला आहे. #354 असा हॅशटॅग वापरत त्यांनी भारतीय दंड विधानातील कलम ३५४ ची आठवण करुन दिली आहे.

दरम्यान, आव्हाडांवर नुकताच याच कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काही वेळानं त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला. पण पोलिसांनी आपल्यावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला होता. गर्दीतून मार्ग काढताना तक्रारदार महिलेला आपण सहजतेनं बाजुला केलं होतं, त्यामध्ये जाणीवपूर्वक कुठलीही कृती करण्यात आलेली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

पण आता प्रियंका गांधी यांचा एक फोटो ट्विट करत त्यांनी हा प्रकार विनयभंगाचा प्रकार असल्याचं सुचवलं आहे. याद्वारे आव्हाडांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. यानंतर त्यांच्या ट्विटवर युजर्सच्या उलट-सुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

Marathwada News: मराठवाड्यात कृषी पर्यटनाला चालना ; १५० शेतकऱ्यांची नोंदणी, ११६ कृषी पर्यटन केंद्रांची पाहणी

SCROLL FOR NEXT