Haseena Parkar
Haseena Parkar Esakal
महाराष्ट्र

Money Laundering Case : हसीना पारकरच्या मुलाची ईडीकडून चौकशी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim), इकबाल कासकर आणि हसीना पारकर (Haseena Parkar) यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू आहे. दरम्यान आज दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाची ईडीकडून चौकशी करण्यात आली. गेल्याच आठवड्यात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी (ED) ने हसीना पारकरच्या घरावरही छापे टाकले होते. आता तीच्या मुलाची चौकशी करण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हसीना पारकरच्या घरावरही छापे टाकले होते

संपत्ती कराराबाबत ईडीने धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) हे भारतातील अंडरवर्ल्ड डॉन, मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या डार्कनेट (Darknet) आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या वापराचा तपास करत आहे. अंडरवर्ल्ड डॉन ऑफशोअर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिजिटल करंसीचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दाऊद इब्राहिम बेटिंगपासून ड्रग्ज तस्करी आणि खंडणीपर्यंतच्या अनेक अवैध धंद्यात सामील असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी त्याच्या अनेक साथीदारांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

दरम्यान सुरुवातीला ईडीने इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि दाऊदची बहीण हसिना पारकरच्या नागपाडा येथील घरासह, दोन बिल्डर्स आणि मुंबईभर छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणा इब्राहिमचा विश्वासू सहकारी छोटा शकीलच्या जवळच्या नातेवाईकाची चौकशी करत आहे. अधिका-याने सांगितले की, अद्याप तपास सुरू आहे आणि अनेक व्यवहार तपासले जात आहेत. अधिकार्‍यांच्या मते प्रामुख्याने बेकायदेशीर फाइल शेअरिंगसाठी लिमीटेड अॅक्सेस असलेले कंप्युटर नेटवर्क वापरले जातात त्यामुळे तपासात अडचणी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT