Maharashtra Mansoon Update  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : मान्सून अतिसक्रिय! राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्यात मान्सून अति सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात अति मुसळधार पाऊस झाला असून उद्यापासून पुढील ३ दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

राज्यात मॉन्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून २९ सप्टेंबर पर्यंत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहिल अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी दिली आहे

त्या पुढे म्हणाल्या की, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी मान्सून सबड्युड असणार आहे. तर २६ सप्टेंबरनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या अरबी सुमद्रावर एक सिस्टीम तयार होण्याची शक्यता आहे. त्या सिस्टीमच्या प्रभावाखाली २६ सप्टेंबर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं.

२४ सप्टेंबर ते २६ संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT