Farmers loss Sakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही - कृषीमंत्री

परतीचा पाऊस पहिल्या वर्षी झाला असं नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही, असंही सत्तार म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. मात्र अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तसंच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंचनामे आणि भरपाईचे आदेश दिले. मात्र राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ज्या भागात नुकसान झालं आणि त्या भागाचे पंचनामे केल्यावर किती नुकसान झालं ते समजेल, असंही सत्तार म्हणाले.

परतीचा पाऊस पहिल्या वर्षी झाला असं नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही, असंही सत्तार म्हणाले. आमच्याकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती येत आहे. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन सत्तार यांनी दिलं आहे. आत्तापर्यंत सरकारने साडेपाच हजार कोटी रुपयांनी नुकसान भरपाई दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaganyaan Mission: अंतराळात भारताची दमदार एन्ट्री! गगनयान चाचणीत ISRO ने पुन्हा इतिहास घडवला, एअरड्रॉप चाचणीत उल्लेखनीय यश

IPL 2026: विजयाची मालिका कायम राखणार? राजस्थानसमोर गतविजेत्या बंगळूरचे आव्हान; कशी असेल प्लेइंग-११

Ayush Shetty: आयुष शेट्टीची उपांत्यपूर्व फेरीत धडक; आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा, सिंधू, प्रणोय, उन्नतीचे आव्हान संपुष्टात

Solapur Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन महिने कारावास, एकतर्फी प्रेमातून मुलीचा वारंवार पाठलाग!

Latest Marathi News Live Update : महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT