maharashtra monsoon Update
maharashtra monsoon Update google
महाराष्ट्र

राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस, 'या' भागांना सतर्कतेचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

कोकणसह महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे

यंदाचा मान्सून पुढे दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत म्हणजेच जुनच्या पहिल्या आठवड्यात तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे कोकणसह महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. (maharashtra monsoon Update)

महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी उष्ण वातावरण आहे. त्यामुळे आज कोकणसह काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे. पावसासोबत वाऱ्याचाही वेग असल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अशात ६ ते १० जून या काळात महाराष्ट्रात मान्सून बरसेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. सध्या मान्सून अरबी समुद्राचा मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या काही भागात दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मान्सून वेळेवर येणार असल्याची माहिती दिली असल्याने शेतकऱ्यांची शेतीकामाची धांदल वाढली आहे. शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे. राज्यात यंदा साधारण ८२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT