monsoon update imd  sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Updates : मुंबईत पाऊस पण जोर नाही; उर्वरित महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन दोन आठवडे लोटल. मात्र प्रत्यक्षात पाऊस काही पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. काहींनी पेरण्या केल्या परंतु बियाणं वाया गेलं.

आजपासून मान्सूनचं पुनरागमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. इतर राज्यातमध्ये नागपूर, नांदेड आणि काही ठिकाणी पाऊस सुरु झालेला आहे. तर अनेक ठिकाणी वातावरणात बदल झालेला असून ढग दाटून आलेले आहेत.

८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र ११ जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. मात्र पुन्हा पाऊस गायब झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून गेल्याचं सांगण्यात येत आहे. नंतर हवामान विभागाने २३ जून रोजी मान्सून परतणार असल्याचं सांगितलं होतं.

आज सबंध महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा आहे. सकाळी मुंबईमध्ये हलक्या सरी बरसल्या. तसेच नागपूरमध्ये पावसाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये पाऊस सुरु झालाय. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली.

उशिरा का होईना पण मान्सून दाखल झालेला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाची अपेक्षा आहे. बळीराजा पेरणीसाठी अडकून पडला आहे. सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आजपासून तरी वरुणराजा बरसावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT