Hiware Bazar esakal
महाराष्ट्र बातम्या

Mosquito Offer : एक डास पकडा अन् ४०० रुपये मिळवा, महाराष्ट्राचं 'हे' गाव पुन्हा चर्चेत

या गावात एवढी साफसफाई असते की, जर एकही डास सापडला तर ते ४०० रुपयांचे बक्षिस देतात.

सकाळ डिजिटल टीम

Most Clean Village in Maharashtra : राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार हे असं एक गाव आहे जिथं ८० लोक करोडपती आहेत. एवढेच नाही तर इथे एकही डास सापडत नाही. जर इथे एकही डास सापडला तर ४०० रूपये बक्षिस दिसं जातं.

Hiware Bazar

हिवरे बाजार हे गाव कधीकाळी दुष्काळग्रस्त होतं. पण इथल्या लोकांनी स्वतःच्या मेहनतीने या गावाचा सगळा चेहरामोहराच बदलून टाकला. या गावात ३०५ कुटुंब राहतात. ज्यापैकी ८० लोक करोडपती आहेत. १९९० च्या काळात हिवरे बाजारचे ९० टक्के लोक गरिब होते. पण आता या गावाचं भाग्य बदललं आहे.

Hiware Bazar

जाणून घ्या कहाणी

हे गाव ८०-९० च्या दशकात दुष्काळग्रस्त होतं. प्यायलाही पाणी नव्हतं. काही लोक तर कुटुंबासहित गाव सोडून निघून गेले होते. पण तरीही गावातल्या लोकांनी आशा सोडली नाही. गावाला वाचवण्यासाठी पदर खोचला आणि कामाला लागले. १९९०मध्ये गावकऱ्यांनी जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी बनवली. याअंतर्गत गावात विहिरी खोदणे, झाडी लावणे, श्रमदानाला सुरूवात झाली. याकामासाठी महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम अंतर्गत फंड मिळाला. यासाठी गावातल्या लोकांनी खूप मदत केली.

'या' पिकांना बंदी झाली

पाणी वाचवण्यासाठी गावातल्या लोकांनी काही पिकांना बंदी केली. ज्या पिकांना पाणी जास्त लागतं ती पिकं बंद केली. गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आता या गावाचा जलस्तर ३०-३५ फूटापर्य़ंत आला आहे. गावातल्या बोअर विहिरी संपल्या आहेत.

पाणी वाचवण्यासाठी केले हे उपाय

आधी या गावात ऊस आणि ज्वारीचं पिक घेतलं जात होतं. पण यावर बंदी केल्यावर बटाटा आणि कांद्याची शेती केली जात आहे. यामुळे या लोकांना बराच पैसा मिळत आहे. इथले लोक आता पावसाची वाट पाहत नाहीत तर कमी पाण्यावर उगणारी पिकं घेतात.

या गावात ३०५ कुटुंब आहेत. ज्यात १२५० लोक आहेत. यापैकी ८० लोकं करोडपती आहेत. ५० पेक्षा जास्त कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न १० लाखापेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT