Ravi Rana and Navneet Rana Ravi Rana and Navneet Rana
महाराष्ट्र बातम्या

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा कोरोना पॉझिटिव्ह

अमरावतीमधील युवा स्वाभिमानचे पदाधिकारी तसेच संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona positive) आला आहे. सध्या ते मुंबई येथे आहेत. संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी तसेच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) तसेच आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) हे सहभागी होत होते. युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापनदिनसुद्धा १२ जानेवारीला मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. यावेळी चांगलीच गर्दी झाली होती. सोबतच राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता.

या सोहळ्याच्या निमित्तानेसुद्धा सलग तीन दिवस चांगलीच गर्दी झाली होती. त्यामुळे कुणाच्यातरी संपर्कात आल्याने राणा दाम्पत्याला कोरोनाची (Corona positive) लागण झाल्याची शक्यता आहे. सध्या ते मुंबई येथील निवासस्थानी असून, अमरावतीमधील युवा स्वाभिमानचे पदाधिकारी तसेच संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन राणा दाम्पत्याने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT