MP Sanjay Raut allegations phone tapping on shinde fadnvis govt rahul gandhi pegasus spyware statement  
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : फॉन टॅपिंगबाबत संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर..

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलत असताना पेगासस स्पायवेअरबाबत गंभीर आरोप केले, यानंतर आता देशातील राजकीय नेत्यांच्या फोनवर पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपांवा खासदार संजय राऊत यांनी देखील मोठा खुलासा केला आहे. त्यांनी फोन टॅपिंग प्रकराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तसेच राज्यातील शिंदे भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

देशातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की या नेत्यांमध्ये मी देखील आहे. माझ्यासह आमच्या प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केले गेले हे रेकॉर्डवरती आलं. त्यानंतर फोन टॅपिंगसंदर्भात ज्या महिला आयपीएस आधिकाऱ्यांनी याचे आदेश दिले होते त्यांच्या विरोधात आम्ही चौकशी सुरू करून गुन्हा दाखल केला.

पण हे नवीन सरकार (शिंदे-फडणवीस सरकार) येताच त्यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात आले. आमच्या सर्वांचे फोन टॅपिंग करणं, राहुल गांधींपासून या देशातील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण एकाचीही चौकशी झाली नाही. उलट त्या अधिकाऱ्यांना फडणवीस सरकारनं बढती दिली असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

तक्रारदारच न्यायाधीश कसा?

हक्कभंग प्रस्ताव मांडणाऱ्या लोकांनाच हक्कभंग समितीत स्थान दिल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, याबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना विधिमंडळ कामाचा जास्त अनुभव आहे. मी काय बोललो हा विषय नंतर येईल, पण तक्रारदाराला तुम्ही न्यायाधीश कसं करू शकता. मी संपूर्ण विधिमंडळाला कधीही असभ्य भाषेत बोललो नाही, काय कुठे बोलायचं ते मला माहिती आहे, आमच्यातले जे ४० लोकं ज्यांनी गद्दारी केली माझा उल्लेख हा तेवढ्या गटापुरता होता असेही राऊत यावेळी म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दावा केला आहे की त्यांच्या आणि इतर अनेक विरोधी नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस स्पायवेअर होते आणि गुप्तचर अधिकार्‍यांनी स्वत: त्यांना बोलतांना सावधगिरी बाळगा कारण त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले जात आहे असे सांगितले होते. केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात राहुल गांधी यांनी भारतात लोकशाहीवर हल्ला होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही संरचना नष्ट करत असल्याचा आरोपही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT