sanjay raut Shivsena Mp Sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

'शेतकऱ्यांवर कारवाई करणं हे भाजपचं अधिकृत धोरण आहे का?'

भाग्यश्री राऊत

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri violence) जिल्ह्यातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. यामध्ये आठजण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यावरूच शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकारला शेतकरी देशद्रोही वाटले का? शेतकऱ्यांवर कारवाई करणे हे भाजपचं अधिकृत धोरण आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

या देशात शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. त्यांच्यावर हल्ले करून नरसंहार केला जात आहे. गुंडे आणून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न भाजप करतेय का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्याठिकाणी हिंसाचार झाला, त्याठिकाणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं. प्रियांका गांधींना देखील प्रवेश दिला नाही. ही भाजपची दडपशाही आहे. इतर पक्षाच्या नेत्यांना रोखणे ही कोणती लोकशाही आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चढविली. हे कौर्य येतं कुठून. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला शेतकऱ्यांविरोधात द्वेष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगतात. पण, असे पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत, त्याच पक्षाकडून शेतकऱ्यांविरोधात धोरण राबविले जात आहे. त्यांच्याच पक्षाचे मंत्री शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतात. ब्रिटीशांच्या काळात असा अत्याचार होत होता. मुंबई बाबू गेनूवर ट्रक घालून त्याला चिरडण्यात आले होते. त्याचप्रमाणे लखीमपूरमध्ये घडले आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केला.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हिंसाचार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT