महाराष्ट्र

कोविड-19 रुग्णालयांसाठी महावितरणने करावी पर्यायी वीजपुरवठ्याची सोय 

संतोष सिरसट

सोलापूर ः पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णालयांना महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून ठेवावी. सोबतच या रुग्णालयांतील स्वयंचलित जनरेटर (डीजी सेट) देखील सुस्थितीत असल्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित पालिकांचे विद्युत विभाग यांच्या समन्वयातून करण्यात यावीत. शहरी भागातील मोठ्या गृहनिर्माण सहकारी सोसायट्या, व्यापारी संकुलांना देखील वीज खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. 

श्री. नाळे म्हणाले, पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्व मंडल कार्यालयांना मुबलक प्रमाणात वीजमीटर दिले आहेत. त्यामुळे वेगळी वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा सर्व वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित करा. ज्या वीजजोडण्यांसाठी नवीन वीजयंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे त्याचे काम देखील ताबडतोब करा. याकामी अधीक्षक अभियंत्यांनी स्वतः पाठपुरावा करावा. उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील मंजूर वीजजोडण्या येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे कामांना वेग द्यावा. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी सौर प्रकल्पांसाठी जागांची निवड करण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

शहरी व ग्रामीण भागामध्ये अकृषक वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात बिघाडरहित अकृषक रोहित्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदारांकडून सर्व वितरण रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात यावी. रोहित्र अतिभारित असल्याचे दिसून आल्यास त्याची क्षमतावाढ करण्यात यावी. यानंतरही अकृषक वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास त्याच्या कारणमिमांसेत दोषी आढळलेल्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे श्री. नाळे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT