msrtc stike esakal
महाराष्ट्र बातम्या

ST: 11 कर्मचारी बडतर्फ, 27 जणांना कारणे दाखवा; अनिल परब अ‍ॅक्शन मोडवर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. गेल्या साधारण दीड महिन्यापासून हा संप सुरु (MSRTC Strike) असून आता तो आर या पारच्या स्थितीत असल्याचं दिसून येतंय. कामगार आपल्या मागण्यांवर पूर्णपणे ठाम असून एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतलाच जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतलेली आहे. दुसरीकडे हा संप संपवण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कामगारांना पगारवाढही करुन दिली आहे. दुसरीकडे जे कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. (MSRTC)

एस टीचा संप कायदेशीर रित्या हाताळण्यासाठी अनिल परब पुढाकार घेत आहेत. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आज ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. आज २७ कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा नोटीस' देण्यात आली आहे. या आजच्या 27 जणांना दिलेल्या नोटीशीनंतर आतापर्यंत एकूण 257 नोटीसा देण्यात आल्या आहेत.

सध्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तर राज्य परिवहन महामंडळातील 21873 कर्मचारी कामावर हजर आहेत. तर दुसरीकडे प्रत्यक्ष संपामध्ये 67675 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. सध्या महाराष्ट्रातील 122 आगार चालू आहेत तर राज्यातील 128 आगार बंद आहेत. महामंडळाद्वारे आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 2718 फेऱ्यांद्वारे वाहतूक चालू आहे.

आज एकूण 52 कामगारांची बदली करण्यात आली असून या आकडेवारीसह आतापर्यंत एकूण 2624 कामगारांची बदली करण्यात आली आहे. आज एकूण 111 कामगार निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 10481 कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे. आज एकूण दोन कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघांसह आतापर्यंत एकूण 2043 कामगारांची अशाच प्रकारे सेवा समाप्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT