Sharad Pawar File Photo Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai News : मतभेद विसरून देशासाठी एकत्र या; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आवाहन, उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर टीका

रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग - ‘‘ जाती, धर्मामध्ये भांडण लावण्याचे काम काही देशविघातक मंडळी करत आहे त्यांना आवर घालण्यासाठी आज देशाला एकोप्याची गरज आहे. भलेही पक्षीय मतभेद असतील, हे मतभेद विसरून देशाच्या भल्यासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन कामाला लागावे,’’ असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी श्रीवर्धन येथे केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, ‘शेकाप’चे सरचिटणीस जयंत पाटील हे इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

‘‘ देशात एकोपा टिकविण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष तसेच इतर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या विकासासाठी हा निर्णय असल्याने आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या,’’

अशी साद पवार यांनी उपस्थितांना घातली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करण्याचे करत असून त्यांचा हा ढोंगीपणा इंडिया आघाडी उघड करणार आहे. शिर्डी येथे आल्यानंतर मोदी यांनी आरक्षणासंदर्भात बोलणे अपेक्षित असताना पवार यांनी कृषिमंत्री म्हणून देशासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.

देश एका राजकीय लढ्याला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून हा लढा उभा होत असून आपापसातील मतभेद विसरून सर्व समविचारी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही केव्हातरी एकमेकांच्या विरोधात काम केले आहे. मात्र आता सर्व मनापासून एकत्र आलो आहोत.

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT