Mumbai Police issues notice to MNS activists
Mumbai Police issues notice to MNS activists Mumbai Police issues notice to MNS activists
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; महाआरती न करण्याचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांचा विषय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच उचलून धरला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे रोजीचा अल्टीमेटम राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला दिला होता. मात्र, रविवारी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी ४ मे ही नवीन तारीख दिली. चार तारखेला मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना कलम १८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. (Mumbai Police issues notice to MNS activists)

मंगळवारी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद आहे. त्यांच्या सनात कोणत्याही प्रकारचे विष कालवायचे नाही. त्यामुळे ३ मे रोजी भोंग्यांसंदर्भात दिलेली तारीख ४ मे पर्यंत वाढवली. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर ४ मे रोजी काहीही ऐकणार नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) रविवारच्या सभेत म्हटले होते.

तसेच सोमवारी ट्विट करीत नवे आवाहन केले होते. ‘उद्या (ता. ३) ईद आहे. रविवारच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे (tweet) आपल्यासमोर मांडेन.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

४ तारखेला राज ठाकरे यांच्या आवाहनावरून मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू शकतात. यामुळे राज्यातील वातावरण आणखी खराब होऊ शकते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून मुंबई पोलिसांनी (Mumbai police) मनसे कार्यकर्त्यांना कलम १८८ अंतर्गत नोटीस (Notice) बजावली आहे.

नोटीसमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा म्हणू नये असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मशिदींसमोर महाआरती न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नोटीसनंतरही हनुमान चालिसेचे पठण केले तर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT