Mumbai Police notice to Raj Thackeray Mumbai Police notice to Raj Thackeray
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांची नोटीस; पोलिस अलर्ट मोडवर

कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सोमवारी मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. मंगळवारी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे सुरू केले होते. यानंतर राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणणाल असल्याचे पत्रक काढले होते. यामुळेच रात्री उशिरा राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. (Mumbai Police notice to Raj Thackeray)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरात बुधवारी पाहटेपासून तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अलर्ट मोडवर आले आहे.

भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी दोन पानी पत्रक काढले होते. यात अजान वाजल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे म्हटले होते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना १४९ अंतर्गद नोटीस बजावली आहे.

मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे सरकारला आधीच सांगितले होते. परंतु, याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतता प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत आहे. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध रुग्ण अशक्त व्यक्ती लहान मुले, विद्यार्थी यांना भोग्याच्या आवाजामुळे होणान्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की ‘रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु, ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.’ असे असतानाही नियम पाळले जात नाही आहे.

यामुळे राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे पत्रकात स्पष्ट केले होते. यामुळे मनसेचे कार्येकर्ते मशिदींमसोर हनुमान चालिसा म्हणतीय या विचाराने मुंबई पोलिस अलर्ट झाले आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी १४९ अंतर्गद नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT