Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Highway Accident : बस दरीत कोसळून 13 प्रवासी ठार; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Mumbai-Pune Highway Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

त्याशिवाय, या बसमध्ये एकूण 40 ते 45 जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळं मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी 20 ते 25 जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'सध्या 18 प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर, 10 प्रवाशांना खोपोली आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.'

या दुर्घटनेत 29 प्रवाशी जखमी झाले आहेत. यात 24 पुरुषांचा समावेश आहेत. ही अतिशय दुर्देवी घटना आहे. जे प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना शासन मदत करेल. तसेच जे लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. याशिवाय ही बस कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे, याची देखील चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT