Aryan, Munmun, Arbaz 
महाराष्ट्र बातम्या

मुनमुन धामेचाचं नाव विनाकारण गोवण्यात आलं; वकिलांचा कोर्टात दावा

"मुनमुनला जामीन मिळावा, तिच्याकडं कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले"

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आर्यन आणि आरबाज यांच्या जामीनाला विरोध केल्यानंतर एनसीबीनं मुनमुन धामेचा हीच्या जामिनाला देखील विरोध केला. हे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यांपैकी कोणालाही जामीन देण्यात येऊ नये, हा तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे, असं एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात सुनावणीदरम्यान म्हटलं. परंतू, मुनमुन धामेचा हीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा अशी कोर्टाकडे मागणी करताना त्याचं कारणंही स्पष्ट केलं आहे.

मुनमुनच्या वकिलांनी म्हटलं की, "मुनमुनचा आर्यन किंवा आरबाज या कुणाशीही थेट संबंध नाही. ती त्यांना ओळखतही नव्हती. त्याचबरोबर तिच्याकडून जरी अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असले तरी त्याचं प्रमाण खूपच कमी होतं. एनडीपीएस कायद्यानुसार अंमलीपदार्थ्यांचं प्रमाण किती आहे हे महत्वाचं असतं. त्या प्रमाणानुसार संबंधित आरोपीला शिक्षा दिली जाते.

जर अंमली पदार्थ इतरांना विकण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर ते जवळ बाळगत असाल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. मात्र, जर ते कमी प्रमाणात असेल किंवा वैयक्तित सेवनासाठी स्वतःजवळ ठेवलं असेल तर शिक्षेची तरतूद कमी आहे. हाच दावा मुनमुनच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. या आधारेच मुनमुनचा या ड्रग्ज तस्करीशी किंवा पकडलेल्या आरोपींशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळं कोर्टानं आपल्याला जामीन द्यावा अशी मागणी मुनमुन धामेचा हीनं आपल्या वकिलांकरवी केली आहे.

आतंरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशी याचे धागेदोरे गुंतलेले आहेत. ही गौतम बुद्ध आणि गांधींची भूमी आहे. तसेच स्वातंत्र्यवीरांना या सैर स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता का? त्यामुळं कोणालाही जामीन देण्यात येऊ नये. कठोर शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत. अशी भावनिक साद एसीबीनं कोर्टात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT