Murder esakal
महाराष्ट्र बातम्या

Murder: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, तिघांना अटक; विदर्भात घडला थरार

अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला करण्याचे कारण अत्यंत किरकोळ असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कृषीनगर जवळच्या तोष्णीवाल ले-आऊटमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल मधुकर झाटे (18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. (Murder of 12th student three arrested the thrill happened in Vidarbha)

बारावीत शिकणारा मृतक हा कृषी नगर परिसरातील तोष्णीवाल ले-आऊटमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोळा गावचा रहिवासी आहे. 1 जानेवारी रोजी रात्री नियमित वेळेत जेवण करून तो आपल्या खोलीत परत येत असताना तीन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कृषीनगर जवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी साहिल सतीश आठवले (वय 21, रा. न्यू भीम नगर कृषीनगर), मंगल बाबुलाल चव्हाण (वय 31, रा. नेहरू नगर कृषी नगर) आणि राहुल गणेश तायडे (वय 32, रा. न्यू भीम नगर कृषीनगर) यांना अटक केली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कलम 302,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर एसडीपीओ सुभाष दुधगावकर, गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. आरोपींची ओळख पटल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने रात्री उशिरा वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक केली. अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला करण्याचे कारण अत्यंत किरकोळ असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात अखेरच्या सुनावणीची तारीख जवळ; शिंदेनी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची प्रोसेस सुरु केली? ठाकरे काय म्हणाले?

Ajit Pawar : राहुल पाटील सतेज पाटीलांची साथ सोडणार, मंत्री हसन मुश्रीफांची मध्यस्थी; साखर कारखाना वाचवण्यासाठी धडपड

Tax Audit Forms: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! कर ऑडिटसाठीचे फॉर्म्स आता ‘लाइव्ह’, कसे भरायचे ते जाणून घ्या

Uddhav Thackeray Interview: देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव? उद्धव ठाकरेंचे खोचक उत्तर, नाव न घेता फडणवीस टार्गेट!

India vs England Women Cricket: लॉर्ड्‌सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना

SCROLL FOR NEXT