Uday Samant esakal
महाराष्ट्र बातम्या

नगरपंचायत निकालानंतर उदय सामंत म्हणाले, महाआघाडीचा पराभव मान्य....

महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा महाविकास आघाडी पुढे आहे; उदय सामंत

अर्चना बनगे

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चार नगरपंचायत (Nagarpan chayat Election 2022) पैकी वैभववाडी व दोडामार्ग नगरपंचायतवर भाजपने (BJP) निर्विवाद सत्ता राखली आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीचा दोन मतांनी पराभव झाला. हा पराभव आम्ही मान्य केला असून, आत्मचिंतन करत आहोत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी भाजपपेक्षा पुढे आहे. निवडणुकीमध्ये दोन मताने जरी आमचा पराभव झाला असणार तरी तो आम्ही स्वीकारला आहे. एकहाती सत्ता मिळवली या शब्दप्रयोगा बद्दल मला थोडा आक्षेप आहे. पराभव झाला आहे आणि तो आम्ही मान्य केला आहे. त्याचे आत्मचिंतन करत आहोत. जिल्हा बँकेत सार्वत्रिक मतदान झाले. यामध्ये शिवसेना 140 मताने पुढे आहे. दोन मते जर मिळाली असती तर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच पुढे आली असती. यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा महाविकास आघाडी पुढे आहे. असे ते म्हणाले.

देवगड-जामसांडे (Vaibhavwadi,Dodamarg)नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी आठ जागा भाजप व आठ जागा शिवसेनेच्या निवडून आल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या एक उमेदवार निवडून आले आहेत. या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढली होती. त्यामुळे येथे सेना-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. भाजप काटावर येऊन या परीक्षेत नापास झाल्याने भाजपचे नितेश राणे यांना धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT